उस्मानाबाद :- नागरीकांना मुलभूत गरजा पुरविण्यास शासन कटिबध्द असून जनतेला नियमित पिण्याचे शुध्द पाणी, वीज, दळणवळणासाठी  मजबुत रस्ते, रस्त्यावर पथदिवे बसवून जनतेस मुलभूत सुविधा संबंधित यंत्रणेनी पुरवाव्यात, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूरात बोलताना केले.
            यावेळी माजी आमदार नरेंद्र बोरगांवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, नगराध्यक्ष अर्चनाताई, गंगणे, गोकुळ शिंदे, अशोक मगर, तहसिलदार व्ही. एल. कोळी, मुख्याधिकारी संतोष जिरगे, वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता मामीलवार, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदि उपस्थित होते.
            पालकमंत्री चव्हाण म्हणाले की,  तुळजापूर शहरास येत्या 3 आठवडयात नळयोजनेतून नियमित पाणी व मार्चपर्यंत अखंडीत वीज चालू ठेवण्यात येईल. वॉर्डा-वॉर्डात सौर उर्जेव्दारे वीज पुरवठा, दलित वस्तीत दोन विंधन विहीरीची कामे त्वरीत हाती  घ्यावीत, ड्रेनेजची व पाणीपुरवठयाची पाईपलाईन टाकावी, अंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे घ्यावीत. वॉर्डात टाक्या ठेवून जनतेला नियमित पाणी पुरविण्यात यावे, परिसर स्वच्छतेसाठी नगरपालिकेनी प्रत्येक वॉर्डात  कचराकुंडी ठेवावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला यावेळी  दिले.  यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वॉर्डात  पाणीपुरवठा योजना व विकास कामांचा शुभारंभही  करण्यात आला.
       पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द, सारा गौरव, लमाणतांडा, अयोध्यानगर, विश्वासनगर, हडको, जिजामातानगर, कणेगल्ली, भोसले गल्ली, मातंगनगर आदि वार्डास  भेटी दिल्या. नागरीकांच्या अडचणी समजावून घेवून त्यांचे जागच्या जागी निराकरण करण्याचे निर्देशन त्यांनी  संबंधित यंत्रणेला दिले. प्रत्येक वॉर्डात महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. तत्पुर्वी पालकमंत्री चव्हाण यांनी तुळजापूर शासकीय विश्रामगृहात शहरातील पाणीपुरवठा व विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची आढावा घेतला.                             
 
Top