मुंबई -: दत्ताजी नलावडे यांच्या निधनाने कामगारांच्या प्रश्नाशी नाळ जोडलेले त्याचप्रमाणे विधीमंडळ कामकाजातील अभ्यासू असे ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
     मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात की, दत्ताजी नलावडे यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा मुंबई शहराच्या विकासासाठी दिला.त्याचप्रमाणे येथे राहणा-या सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक ते राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास नव्या पिढीतील राजकारणी व समाजकारणातील मंडळींसाठी अभ्यासण्यासारखा आहे. 
     नलावडे सातत्याने ४ वेळा विधानसभेवर निवडून गेले.  विधानसभा अध्यक्ष पदाची त्यांची कारकीर्द ही नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे गाजली,  विशेषत: त्यांच्या काळात "उत्कृष्ट संसदपटू" व "उत्कृष्ट भाषण" पुरस्कार सुरु झाले. त्यांच्या निधनाने विविध सामाजिक आंदोलनामध्ये हिरीरीने नेतृत्व केलेल्या एका लढाऊ नेतृत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.
 
Top