सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस (इयत्ता 12 वी) च्या आर्टस/कॉमर्स/ सायन्स या तिन्ही शाखांच्या मराठी विषयाने परीक्षेस सुरुवात झाली सदर परीक्षेकरीता सोलापूर जिल्ह्यातून 46086 विद्यार्थी 69 परीक्षा केंद्रावरुन बसलेले होते. या सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी कॉपीमुक्त अभियानासंदर्भात दिलेल्या सर्व सूचनांनुसार 69 पथके विविध केंद्रावर पाठविण्यात आली होती. सदरची पथके ही परीक्षा केंद्रावर परीक्षेपूर्वी एक तास अगोदर पोहोचलेली होती यांच्या निगराणीमध्ये प्रत्येक केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांना परीक्षेकरीता वर्गात पाविण्यात आलेले होते.
      या सर्व केंद्रावर नियुक्त केलेल्या 69 बैठे पथकातील कर्मचा-यांना संपूर्ण परीक्षेच्या वेळेमध्ये प्रत्येक वर्गावर जाऊन लक्ष देणेबाबतचे आदेश दिलेले होते. त्यानुसार या पथकाने सदरचे काम अत्यंत चोखपणे बजावत 11 विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत प्रश्नांची उत्तरे कॉपी करताना पकडून कारवाई केली असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी कळविले आहे.
 
Top