नवी‍ दिल्ली -: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्‍ट्राच्या वाट्याला काय मिळेल? अशा संभ्रमात असलेल्या जनतेला 'कही खुशी कही गम' देणारा यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प ठरला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी मंगळवारी लोकसभेत 2013-14 साठी रेल्वे अर्थसंकल्प मांडला आहे. त्यात महाराष्ट्राला आठ नव्या गाड्या मिळाल्या तर नागपूर शहराकडे बन्सल साहेबांचे विशेष लक्ष दिले असल्याचे दिसून आले आहे.. 
       नागपूरला  रेल्वेच्या 'नीर' प्लॅन्ट, रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, अद्ययावत लाऊंच सारखे नवे प्रकल्प उभारले जाणार आहेत. सर्वाधिक महसूल मिळवून देणार्‍या मुंबईला मात्र अल्प प्रमाणात न्याय दिला आहे.
    दिल्ली आणि मुंबईदरम्यान आणखी एक राजधानी एक्सप्रेस सुरु होण्याची आशा व्यक्‍त करण्यात आली होती. मात्र ती रेल्वेमंत्री बन्सल पूर्ण करू शकले नाही. मात्र त्यांनी लोकलच्या बाबतील घोषणा करून मुंबईकरांना खूश केले आहे.

नव्या गाड्या...
> अजनी(नागपूर) ते लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला)  (व्हाया हिंगोली)
> हजरत निजामुद्दीन - मुंबई एसी एक्स्प्रेस (व्हाया भुसावळ)
> हुबळी- मुंबई (व्हाया मिरज पुणे) (साप्ताहिक)
> काकीनाडा- मुंबई (आठवड्यातून दोन दिवस)
> कालका- साईनगर एक्स्प्रेस
>  लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला)- कोचुवली एक्स्प्रेस साप्ताहिक
>  मुंबई- सोलापूर एक्स्प्रेस (व्हाया पुणे)
>  उना- नांगल ते हुजुरसाहेब नांदेड (साप्ताहिक)

या गाड्यांचा पल्‍ला वाढविण्‍यात आला आहे
12145/12146 लोकमान टिळक टर्मिनस-भुवनेश्व‍वर एक्‍स्‍प्रेसचा जगन्‍नाथ पूरीपर्यंत विस्‍तार
12545/12546 लोकमान्य टिळक (टी)-दरभंगा एक्स्प्रेस रख्‍सौलपर्यंत (गेज परिवर्तनानंतर)
22107/22108 मुंबई सीएसटी-लातूर एक्स्प्रेस हुजूरसाहेब नांदेड़पर्यंत धावणार
51183/51184 भुसावळ-अमरावती पॅसेंजर नरखेडपर्यंत धावणार

या गाड्यांचा पल्‍ला वाढविण्‍यात आला आहे
12145/12146 लोकमान् टिळक टर्मिनस-भुवनेश्‍वर एक्‍स्‍प्रेसचा जगन्‍नाथ पूरीपर्यंत विस्‍तार
12545/12546 लोकमान्य टिळक (टी)-दरभंगा एक्स्प्रेस रख्‍सौलपर्यंत
 
Top