नळदुर्ग -: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लीश मेडियम स्कूल अँन्ड नर्सरी या इंग्रजी माध्यमच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. यावेळी संस्कृती शंकर भाळे या पाच वर्षाच्या बालिकेने आकर्षक नृत्य केले.
या स्नेहसंमेलनाचे उदघाटन राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनीलराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या स्नेहसंमेलनात चिमुकल्या बालकांनी उत्कृष्ट नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवाह मिळविली. त्यात संस्कृती शंकर भाळे या चिमुकलीने मराठी व हिंदी चित्रपटाच्या गीतावर बहारदार नृत्य करुन एकच धमाल केले. संस्कृती बरोबरच प्रतिक्षा कानडे, रशिता खद्दे या चिमुकल्या बालिकेनी आपले आकर्षक नृत्य सादर केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्यक सेवाभावी संस्थेचे सचिव मारुती खारवे तर सूत्रसंचालन दत्ता साखरे यांनी केले. तर आभार अरुण लोखंडे यांनी मानले. या कार्यक्रमास आधार सामाजिक संस्थेचे दयानंद काळुंके, ज्ञानकिरण संस्थेचे भैरवनाथ कानडे, सामाजिक परिवर्तन संस्थेचे मारुती बनसोडे, प्रतिष्ठित व्यापारी अमर भाळे यांच्यासह पालक, नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.