तुळजापूर :- काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला 200 पोती गहू ट्रकसह पोलीसानी जप्‍त केली. जप्‍त केलेल्‍या मुद्देमालाची किंमत सुमारे 6 लाख 60 हजार एवढी आहे. ही कारवाई तुळजापूर-सोलापूर रस्‍त्‍यावरील बार्शी टी पॉइंट येथे शुक्रवारी पहाटे तुळजापूर पोलिसांनी केली. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्‍यात घेतले असून आणखी एक आरोपी फरार झाला आहे.
    बशिर बाशा पटेल (वय 48, रा. दाळिंब, ता. उमरगा) असे पोलीसांनी ताब्‍यात घेतलेल्‍या आरोपीचे नाव आहे. सोलापूर रस्‍त्‍यावरील घाटशिळच्‍या पायथ्‍याशी असणा-या बार्शी टी पॉइंटजवळ शुक्रवारी पहाटे चार वाजण्‍याच्‍या सुमारास ट्रक (एबीटी 1181) पोलिसांनी अडवून ट्रकची पाहणी केली असता या ट्रकमध्‍ये 50 किलो वजनाच्‍या 200 पोती गहू आढळून आल्‍या. याची किंमत 1 लाख 60 हजार असून ट्रकसल 6 लाख 60 हजार एवढा रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी हस्‍तगत केला. यातील नितीन कांबळे हा आरोप फरार होण्‍यात यशस्‍वी झाला.
 
Top