उदगीर : येथील ऐतिहासिक उदगीर किल्ल्यावर असलेला पूर्वीचा झेंडा उतरवून त्या ठिकाणी काही अज्ञातांनी विशिष्ट रंगाचा झेंडा फडकविल्याने शहर व परिसरात धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. यातूनच तणाव निर्माण होत आहे. दरम्यान, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याने शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. एवढेच नव्हे, तर काही भागात मोडतोडही झाली. त्यावेळी जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अनूचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांना जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
किल्ल्यावर झेंडा फडकविल्यावरून शनिवारी सकाळी १० वाजता शहरातील बजरंग दल, भाजप, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, मनसे यासह अन्य संघटनांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र निषेध केला. गुन्हेगारांना अटक करण्याच्या मागणीसाठी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आपला मोर्चा शहर पोलिस ठाण्याकडे वळविला आणि गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावे, अशी मागणी करुन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
यावेळी पोलिस अधिका-यांनी आरोपींना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. येथील ऐतिहासिक उदगीर किल्ल्याला विशेष महत्त्व आहे. उदगीर शहरात शांतता सुव्यवस्था नांदत असताना काहीनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने असा प्रकार घडवून आणला, अशी चर्चा शहरात सुरू आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील पोलीस प्रशासनाने किल्लावरील विशिष्ट रंगाचा झेंडा उतरविला. त्यानंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. तणावाची स्थिती निर्माण झाल्याने जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना प्रथम अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी सौम्य लाठिमार केला.