उस्मानाबाद :- श्रवणशक्ती हरवत चालल्यानेच वाचनसंस्कृती मूळ धरु शकत नाही. त्यामुळे सकस साहित्यापासून आपण दूर चाललो आहोत. अशावेळी वाचनसंस्कृतीचा रिमोट वडीलधाऱ्या मंडळींनी स्वत:च्या हाती घेऊन नवीन पिढीला त्याची ओळख करुन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक-वक्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2013 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा समारोप प्रा. जोशी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी त्यांनी ‘वाचनसंस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन केले. मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
या ग्रंथोत्सवात राज्याच्या विविध भागातून ग्रंथ विक्रेते आणि प्रकाशक सहभागी झाले होते. ग्रंथोत्सवाच्या निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनासही उस्मानाबादकर रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रा. जोशी यांच्या हस्ते यावेळी या ग्रंथप्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. जोशी यांनी सुरुवातीला या ग्रंथप्रदर्शनास भेट देऊन प्रकाशकांशी संवाद साधला.
आपल्या व्याख्यानात प्रा. जोशी म्हणाले की, वाडमयाचा प्रवास हा वाणीतून होतो. चांगले श्रवण करणे, हे साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असते. पूर्वीच्या काळी असणारा साहित्याशी जोडले गेल्याची भावना आज कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. वाचनसंस्कृती वाढवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी चांगले ऐकण्याची मानसिकता निर्माण केली पाहिजे.
साहित्यनिर्मितीचा केंद्रबिंदू पुण्या-मुंबईपासून ग्रामीण भागाकडे वळत आहे, ही आनंदाची गोष्ट असल्याचे सांगून प्रा. जोशी म्हणाले की, आपण सकस साहित्यापासून दूर जाता कामा नये. उत्तम साहित्य आपण वाचले पाहिजे. सुधारणांचे सारथ्य हे संस्कृतीनेच केले पाह्जे. या पिढीने जागतिकीकरण, आर्थिकमंदी, कॅार्पोरेट कल्चर असे प्रवाह अनुभवले. अशावेळी साहित्याने जशी समाजाभिमुख होण्याची गरज आहे, तशीच गरज समाजाने साहित्याभिमुख होण्याची आहे. ग्रामीण भागात सकस साहित्याची भूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठीचे सकस साहित्य कसे निर्माण करणार, हा खरा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या राजकारण्याने सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी मराठी भाषा संचालनालय सुरु केले. मराठी भाषा विकासाला गती दिली. साहित्याची आवड जपणाऱ्या अशा नेत्यांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दिखाऊपणापेक्षा टिकाऊपणा महत्वाचा असल्याचे सांगून प्रा. जोशी यांनी लेखकांनी सर्जनशीलतेचे महत्व ओळखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तसेच तीन दिवस सुरु असणा-या या उपक्रमास पाठबळ देणाऱ्या शासकीय यंत्रणा, मराठवाडा साहित्य परिषद-उस्मानाबाद, नगरवाचनालय, नगरपरिषद वाचनालय, शासकीय ग्रंथालय, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, रसिक वाचक आणि ग्रंथ विक्रेते व वाचक यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रणजीत दुरुगकर यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यलयातील अर्जून परदेशी, अशोक माळगे, शंकर शेळके, मकरंद नातू, अयुब पठाण, नरहरी गुट्टे, सिद्धेश्वर कोंपले, तानाजी सुरवसे, अनिल वाघमारे, अशोक सुरडकर, शशीकांत पवार आणि चित्रा घोडके या सहका-यांनी परिश्रम घेतले.