
या शिबिराचे उद्घाटन पूज्य साध्वी सुमनलताजी यांच्या आशीर्वादाने व नवकार मंत्राच्या जयघोषात करण्यात आले. पूज्य आनंदऋषीजी व पूज्य गणेशलालजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले.
शिबिराची सुरुवात रविवारी सकाळी सात वाजता वर्धमान जैन स्थानकात झाली. यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. तसेच डॉक्टर मंडळी, शतकवीर रक्तदाते सुधीर तम्मेवार तसेच पत्रकार मंडळी, अधिकारी, पोलीस अधिकारी रोहिदास पवार यांनी देखील रक्तदान केले. त्याचबरोबर महिलांनीदेखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. ,
बार्शीतील रामभाईशाह रक्तपेढीने 432, भालचंद्र रक्तपेढी लातूर 220, गोपाबाईदमाणी ब्लड बँक सोलापूर 127, क्रांतीसिंह नाना पाटील सामान्य रुग्णालय सातारा 89, सामान्य रुग्णालय उस्मानाबाद 51 अशा एकूण 919 संकलन करण्यात आले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी धीरज कुंकूलोळ, बापू वाणी, विजय दिवाणजी, प्रशांत बुडूख, कपिल हिंगमिरे, सागर वायकर, बापू ननवरे, उमेश देशमाने, उदय पोतदार, अंकुश कोत्तवार, महेश देशमाने, गिरीश चव्हाण, पापा पटेल, मुन्ना माळी, विजय पाचपुते, राहुल कुंकूलोळ, राजेश राऊत, सागर नायकोजी, विशाल खेडकर, सुजित गायकवाड, सुरज दिवाणे, महेश चौधरी, रमेश देशमाने, भारत पवार, आनंद देशमाने, राजाभाऊ नवगण, राहुल काळे आदी संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.