सांगोला (राजेंद्र यादव) -: तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी ना. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांची वाटचाल सुरू आहे. दुष्काळ हटविणे कोण्या एकाचे काम नसून ती सामुहीक जबाबदारी आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व सोलापूर जिल्हा निरीक्षक प्रदिप गारटकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले.
     सांगोला तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची बैठक आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयात रविवारी पार पडली. या बैठकीस निरीक्षक म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गारठकर बोलत होते. बैठकीस जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, बाबुराव गायकवाड, तात्यासाहेब केदार, राणी दिघे, राजाराम वलेकर, शिवानंद पाटील, रमेश पवार, संदिप बोरकर, रमेश पाटील, रमेश बारसकर, विश्‍वनाथ चव्हाण, चेतनसिंह केदार, वसंत जरे, भिकाजी बाबर, विजय येलपले, सचिन लोखंडे, सतिश काशीद-पाटील, चंद्रकांत शिंदे, तानाजी पाटील, चंचल बनसोडे, तायाप्पा माने, आलमगिर मुल्ला, आनंदा माने, अनिल खडतरे, सरस्वती रणदिवे, महिला आघाडीच्या सखुबाई वाघमारे, पूजा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. देशात व राज्यात कॉंग्रेस व भाजपचे महत्त्व कमी होत चालले असून आगामी निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचे महत्त्व वाढणार आहे. प्रादेशिक पक्षाची ताकद व देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता ना. पवार यांच्यात आहे. आगामी निवडणुकीत याच मतदार संघातून त्यांना नेतृत्व करण्याची संधी कार्यकर्त्यांनी द्यावी, असे सांगून आ. साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत असल्याची जाणीव आजच्या लक्षणीय उपस्थितीवरून दिसून येत असून दुष्काळ हटवायचा असेल तर कार्यकर्त्यांनी मनाची मानसिकता, वैचारिकता बदलली पाहिजे मगच दुष्काळ हटू शकेल असे गारटकर यांनी सांगितले. तालुक्याचा दुष्काळ हटवायचा असेल तर टेंभू, म्हैसाळ व उजनीचे  पाणी आणणे गरजेचे असून त्यादृष्टीने रखडलेल्या सिंचन योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे. इस्त्रायलच्या धर्तीवर उजनी धरणातून सांगोला तालुक्यातील शेतीला पाणी पुरेल असा पायलट प्रोजेक्ट उभा करण्यासाठी लवकरच जनतेचे शिष्टमंडळ घेऊन ना. पवार यांना भेटणार असल्याचे आ. साळुंखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
 
Top