नवी दिल्ली -: १६ डिसेंबरला दिल्लीच्या वसंत विहार भागात झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपी रामसिंगने तिहार जेलमध्ये सोमवारी सकाळी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे.
          बलात्कारातील मुख्य आरोपी रामसिंग याला तिहार जेलमधील नंबर-३ सेलमध्ये ठेवण्यात आले होते. जेल अधिका-यांनी सकाळी पाच वाजता त्याला त्याच्या सेलमध्ये लटकलेले पाहिले. बलात्कारातील आरोपी पवन आणि मुकेशने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती, परंतु रामसिंगने त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना वारंवार फेटाळले होते.
     रामसिंगने त्या युवतीवर फक्त बलात्कारच केला नाही तर, त्यानंतर तिच्या पोटात लोखंडी रॉड घातला होता. त्यामुळे तिच्या पोटाची आतडी तुटली होती.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top