तुळजापूर -: मंगरुळ (ता. तुळजापूर) शिवारातील यमाई तलावामधील गाळ व माती काढण्यावरुन शाब्दीक चकमक उडवून दोन गटात दगड व काठ्यानी झालेल्या तुफान मारहाणीत सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार दि. 14 मार्च रोजी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन पोलिसात 33 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान तुळजाभवानी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील चव्हाण, पोलीस निरीक्षक संजय कुलकर्णी यांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले आहे.
अतुल डोंगरे, अभिजीत डोंगरे, विनायक डोंगरे, नाना सरडे, चित्तरंजन सरडे, अमोल सरडे (सर्व रा. मंगरुळ, ता. तुळजापूर) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील अतुल रमेश डोंगरे यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मारुती सरडे हे १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास येमाई तलावातील गाळ व माती जेसीबीच्या सहाय्याने काढत होते. त्यावेळी योगेश डोंगरे व विजय डोंगरे हे तेथे आले. या तलावात आमचे शेत गेले आहे. यातील गाळ काढू नका असे सांगून शिवीगाळ केली. डोंगरे व सरडे यांच्यामध्ये त्या ठिकाणी बाचाबाची झाली. सदर भांडणाचे वृत्त गावात समजताच चित्तरंजन भालचंद्र सरडे, अजिंक्य भालचंद्र सरडे, भालचंद्र विश्वनाथ सरडे, महेश विजय सरडे, विजय विश्वनाथ सरडे, प्रतापसिंह सतीश सरडे, चित्रसेन सतीश सरडे, उदयसिंह सतीश सरडे, अमोल सुरेश सरडे, शिवाजी शंकर सरडे, संजय गोरख सरडे, भागवत गोरख सरडे, जितेंद्र शहाजी सरडे, दीपक कैलास सरडे, मुकुंद कैलास सरडे, वासुदेव शरद सरडे, नानासाहेब संदीपान सरडे, अप्पासाहेब संदीपान सरडे, प्रवीण शरद सरडे, प्रकाश भालचंद्र सरडे, महादेव संदीपान सरडे (सर्व रा. मंगरुळ) यांनी काठय़ा, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अतुल डोंगरे यांच्या या फिर्यादीवरुन सदरील २२ जणांविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच घटनेतील दुस-या फिर्यादीत नाना संदीपान सरडे यांनी म्हटले आहे की, याच कारणावरुन मकरंद मुकुंद डोंगरे, अतुल रमेश डोंगरे, अमोल रमेश डोंगरे, विजय पंडीत डोंगरे, योगेश सतीश डोंगरे, गिरीश सतीश डोंगरे, अजय पंडीत डोंगरे, बप्पा विकास डोंगरे, अभिजीत दगडू डोंगरे, वैभव दत्तात्रय भोसले, मुकुंद नागनाथ डोंगरे व धनू नागनाथ डोंगरे यांनी काठय़ा, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी संदीपान सरडे यांच्या फिर्यादीवरुन ११ जणांविरुद्ध तुळजापूर पोलिसातगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल देशपांडे हे करीत आहेत.