बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील तालुका विकास मंचच्यावतीने शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आरती चौधरी, द्वितीय नुरजहॉं शेख, तृतीय वैभव खाडे, गीतांजली धस यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बार्शी टेक्निकल हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांकरीता या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत पर्यावरण, शिवाजी महाराजांचा इतिहास या विषयांवर निबंध या स्पर्धा घेण्यात आल्या. बुधवार रोजी या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बार्शी टेक्निकलच्या प्रांगणात मुख्याध्यापक थळकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बार्शी तालुका विकास मंचचे विक्रम सावळे हे अध्यक्षस्थानी होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक तिकटे, पाटील, कराड, राणे, बारकुल, कोरे, खंडागळे, पवार, ताकभाते, सौ.सुरवसे, शेख, घोलप, पाटील, होनमुटे, काळे, हुबळीकर तसेच बार्शी विकास मंचचे अभय सरकाळे, अमर चव्हाण, गणेश कदम, प्रवीण स्वामी, संदिप शिंदे, विवेक दिक्षीत, इश्वर अंकुशे, विशाल ढोले, ऋषिकेश मुंढे, बालाजी मुळे, शुभम खराडे यांनी विशेष प्रयत्न केले.