बार्शी -: उन्हाळ्यातील चटके बसत असतांनाच व पाण्याचा दुष्काळ पसरलेल्या परिस्थितीत बार्शीत चक्क वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.
     शुक्रवारी दुपारी अचानक मौसम बदलून ढग येऊ लागले, सायंकाळच्या दरम्यान मोठे वादळ येऊन रात्री दहा वाजण्‍याच्या दरम्यान पावसाने सुरुवात केली. वादळ सुरु झाल्यावर काही ठिकाणचा विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला. वादळामुळे घराघरात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात साठले. पावसाच्या आगमनाचे बार्शीकर चक्क चक्रावले असून चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्यास जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय होईल.
 
Top