बार्शी -: तावरवाडी ता.बार्शी येथील शेतकरी शरद जालिंदर ढमढेरे (वय 45) याच्या डोक्यात विनोद गवळी फरशी व कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची फिर्याद मयताचा मुलगा विनोद ढमढेरे याने वैराग पोलिसांत दिली.
     याबाबत अधिक म‍ाहिती अशी की,  मयत शरद ढमढेरे हे खांडवी ता.बार्शी येथील शेतकर्‍यास मणुके तयार करण्यासाठी लागणारे शेड दाखिवण्यासाठी तावरवाडी येथे घेऊन आले होते.  यावेळी संशयीत आरोपी विनोद गवळी याने पाठीमागून आरोपीच्या डोक्यात फरशी कुर्‍हाडीने सपासप वार केले.    
     त्यावेळी मयत शरदचा मुलगा विनोद शरद ढमढेरे हा वार अडविण्यासाठी मधे आला, यावेळी त्याच्या हाताला जखम झाली.  दरम्यान, कुर्‍हाडीने वार झाल्याने शरद ढमढेरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मुलगा विनोद याने त्यांना तत्काळ उपचारासाठी बार्शीच्या खासगी रुग्णालयात आणले, परंतु तत्पूर्वीच ते मयत झाले होते.
     फिर्यादीनंतर दोघांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस वैराग पोलिसांनी अटक केली आहे. मयताचा मुलगा विनोद याने दिलेल्या फिर्यादीत म्‍हटले आहे की,  संशयीत आरोपी विनोद गवळी व मयत शरद ढमढेरे या दोघांचे सहा महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात खदखदत होता. या रागातूनच गवळीने शुक्रवारी शरद ढमढेरे या शेतकर्‍याचा खून केला.    
     आरोपी विनोद गवळी यास शुक्रवारीच अटक करण्यात आली.   घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार तसेच वैरागचे पोलीस उपिनरीक्षक सुनील रोहोकले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शविवच्छेदन करण्यात आले.
 
Top