बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील भारतीय स्टेट बँकेच्या सुभाष नगर शाखेतील अस्थायी कर्मचारी यांना सन 1989 पासून काही कामगारांना तर 98 पासून काही कामगारांना कामावरुन कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेळोवेळी अर्ज करुन व प्रत्य़क्ष भेटूनही त्यांना आश्वासनाशिवाय काहीच न मिळाल्याने अखेर संयमाचा बांध फुटून त्यांनी रस्त्यावर येत उपोषणाचा मार्ग अवलंबला.
शुक्रवारी ता.15 रोजी यातील देविदास रोहिदास बगाडे, संजय निरंजन शिंदे, संजय मुरलधर संबरत, अजय बबन बोकेफोडे, सुरेश आप्पा सोनवणे, गोरखनाथ काका वाघमारे (सर्व रा.बार्शी) व सुनिल जगन्नाथ सरवदे (रा. कुर्डूवाडी) यांनी बँकेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
यातील सर्वजण दलित व अशिक्षीत असल्याचा गैरफायदा घेत आमची व आमच्या कुटूंबियांची पिळवणूक होत असून यापुढे आमच्या न्याय हक्काच्या मागण्यांचा विचार न केल्यास आम्ही तीव्र संघर्ष करणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले. सदरच्या घटनेबाबत कामगार नेते तानाजी ठोंबरे यांच्याशी चर्चा करुन कायदेशीर तरतूदीनुसार योग्य त्या प्रकाराने मागण्या मांडण्यात येणार आहेत.