तुळजापूर -: घरात एकटी असल्याचे पाहून एका इसमाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना दिपकनगर, तुळजापूर येथे शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकाविरूद्ध तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अण्णासाहेब रामचंद्र राठोड (वय 40 वर्षे, रा. दिपकनगर, तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहेत. यातील महिला ही तिच्या घरात स्वयंपाक करीत असताना घरात कोणी नसल्याचे पाहून अण्णासाहेब राठोड हा तिच्या घरात प्रवेश करुन महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद सदरील महिलेने तुळजापूर पोलिसात दिल्याने आण्णासाहेब राठोड याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दळवी हे करीत आहेत.