उस्मानाबाद :- जिल्हयातील सर्व माजी सैनिक दरमहा बॅंकेतून निवृत्ती घेत आहेत 6 व्या वेतन आयोगानूसार सुधारीत वेतन मिळत आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे पेन्शन सेलची स्थापना करण्यात आली आहे.
सर्व निवृत्तीवेतन धारक माजी सैनिक/ विधवा निवृत्ती वेतनधारकाची माहिती सेलला पाठवायाची असल्याने निवृत्तीवेतनधारकानी आपली माहिती विहीत नमुन्यात भरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावयाची आहे.
तसेच तालुक्याच्या ठिकाणी माजी सैनिक संघटनेच्या कार्यालयातही फॉर्मस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. माजी सैनिकांकडून (pension co-ordinator) फॉर्म घेवून भरुन दयावा तसेच डिसचार्जबुक, पीपीओ, बॅंकेचे पासबुक आणि इ सी एच एस कार्ड तसेच विधवांनी वरील सोबत पतीचे मृत्युचा दाखला व जन्म दिनांकाचा दाखल्याची छायांकित प्रत जोडण्यात यावी. अधिक माहिती व फॉर्मसाठी संबधितांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केलेआहे.