सोलापूर -: बीएसएफ आणि सीआयएसएफसाठी सोलापूरात जागा निश्वितीची बैठक केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.
    या बैठकीमध्ये यासाठी संभाव्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे टाकळी येथील शंभर एकर शासकीय जमीन आणि सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 9 येथुन एक किलोमीटर अंतरावर असलेली  मुस्ती येथील खाजगी शंभर एकर जमीन  उपलब्ध होवू शकेल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी दिली. या दोन्ही जागांची पाहणी करुन सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
     उद्या केंद्रीय गृहमंत्री स्वत: या जागांची पाहणी करणार असून त्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
    या बैठकीस सीआयएसएफचे महासंचालक राजीव, बीएसएफचे महासंचालक सुभाष जोशी, बीएसएफचे अशोक कुमार, सीआयएसएफचे अंजनीकुमार, श्रीवास्तव, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेश प्रधान, निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण, मुद्रांक जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, दक्षिण सोलापूर तहसिलदार शिल्पा ठोकडे उपस्थित होते
 
Top