सोलापूर -: जिल्हा परिषद हे ग्रामविकासाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. ग्रामविकासाबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी आग्रही रहावे. तसेच या विकासाबाबत प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांच्यात योग्य तो समन्वय साधला जावा अशी अपेक्षा राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जि. प. सदस्य, प.सं.सभापती व अधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा कोल्हे-माळी होत्या.
पुढे बोलतांना श्री. ढोबळे म्हणाले की, जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या अधिकाराचे विकेंद्रीकरण व्हावे त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्यांनी अधिका-यांकडे विकास कामाचे योग्यरित्या सादरीकरण करुन पाठपुरावा करावा. तसेच सदस्यांनी सभागृहात अभ्यास करुनच बोलावे.
जिल्हा परिषदेमध्ये काम करतांना महिला सदस्यांना अशा कार्यशाळेचा निश्चित फायदा होऊ शकेल असा आशवाद जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. माळी यांनी व्यक्त केला. तर अधिकारी व पदाधिकारी ही प्रशासनाची चाके असुन यामध्ये समन्वय साधला जावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांनी प्रास्ताविकात केली.
या कार्यशाळेमध्ये ग्रामसमृध्दी योजना या विषयावर जि. प. चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, अधिकारी -पदाधिकारी योग्य समन्वय या विषयावर बाबा कारंडे, विविध समित्यांचे आर्थिक अधिकार या विषयावर सुरेश सारंगकर तर जि. प., पं.स. सभा कामकाज व ग्रामपंचायत अधिनियम या विषयावर भारत शेंडगे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी जि.प. उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जि. प. विविध विभागाचे सभापती सर्वश्री शिवाजी कांबळे, शिवानंद पाटील, जालिंदर लांडे, जि. प. (प्रशासन) उप मुख्यकार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदि उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरुव यांनी आभार मानले.