कळंब :- आठवड्यात चार ठिकाणी राज्यात पत्रकारांवर हल्ले होत असून महाराष्ट्रातील पत्रकारांनी पक्षपात, संघटना व मतभेद विसरुन एकत्रित येणे ही काळाची गरज बनली असून पत्रकार हल्ला विरोधी कायदा होण्यासाठी दि. ८ एप्रिल रोजी पुणे ते मुंबई येथील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा निवासापर्यंत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी केले.
पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी कळंब (जि. उस्मानाबाद) येथे मंगळवार दि. १९ मार्च रोजी धावती भेट दिली असता त्यांचा कळंब येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार पार्श्वनाथ बाळापुरे, सतिश मडके, भिकाजी जाधव, सचिन ढेले, गणेश शेळके, माधवसिंग राजपूत आदीजण उपस्थित होते. यावेळी भिकाजी जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.