नळदुर्ग (भैरवनाथ कानडे) -: सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्याबद्दल तुळजापूर लाईव्‍हचे संपादक  शिवाजी नाईक, नुकतेच पदोन्‍नती मिळालेल्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांचे नळदुर्ग शहर व परिसरातील विविध सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने भव्‍य सत्‍कार करण्‍यात आले.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी रिपाइंचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे तर प्रमुख अतिथी म्‍हणून पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख, परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारुती बनसोडे आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्‍या प्रारंभी प्रमुख अति‍थीचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यानंतर तुळजापूर लाईव्‍हचे संपादक शिवाजी नाईक यांना राज्‍यस्‍तरीय युवाचेतना पुरस्‍कार मिळाल्‍याबाद्दल तर नळदुर्ग पोलीस ठाण्‍यात पोलीस उपनिरीक्षक म्‍हणून कार्यरत असलेल्‍या व नुकतेच सहाय्यक निरीक्षक म्‍हणून मिळालेले प्रकाश गायकवाड, युवा कार्यकर्ते प्रवीण राठोड यांची रिपाइंच्‍या (गवई) जिल्‍हा उपाध्‍यक्षपदी निवड झाल्‍याबद्दल शाल, पुष्‍पहार, श्रीफळ देऊन रिपाइंचे जिल्‍हाउपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे मारुती बनसोडे, आधार संस्‍थेचे दयानंद काळुंके, भटक्‍या विमुक्‍त संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष अशोक अलकुंटे प्रज्ञावंत संस्‍थेचे दादासाहेब बनसोडे, गुरु रोहिदास क्रांती रयतचे सोमनाथ बनसोडे, सम्‍यक संस्‍थेचे मारुती खारवे आदींच्‍या हस्‍ते भव्‍य सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड यांनी तर सुत्रसंचालन ज्ञानकिरण संस्‍थेचे सचिव भैरवनाथ कानडे यांनी केले.
 
Top