नळदुर्ग -: येथील शास्त्री चौकात असलेल्या माऊली फूटवेअर अँन्ड गायत्री मंगल भांडारच्यावतीने नागरिकांसाठी मोफत पाणपोई सुरु करण्यात आली आहे. माऊली फुटवेअरचे शंकर वाघमारे यांनी गेल्या अकरा वर्षापासून मोफत पाणपोईचे उपक्रम राबवित असून रविवार दि. 10 मार्च रोजी माजी नगरसेवक दिलीप कुलकर्णी यांच्या हस्ते पाणपोईचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पद्माकर घोडके, डॉ. काटकर, मारुती घोडके, आकाश कुलकर्णी, संदिप हजारे, सुनील गव्हाणे, मनोज दस, बालाजी घोडके, रवी ठाकूर, दत्तु कांबळे, जमत ठाकूर, विजय ठाकूर, महादेव फरताळे, सुदर्शन पुराणिक, महेश वाघमारे आदीजण उपस्थित होते.