उमरगा -: दोन मालमोटारीच्‍या भीषण धडकेत चारजण ठार तर दहापेक्षा अधिकजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना मंगळवार दि. 19 मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली. ही घटना कराळी पाटी (ता. उमरगा) येथील एका अवघड वळणावर घडली.
    अनुराधा पंडीत जाधव (वय 50), गुणगुण युवराज साळुंके (वय 1 वर्षे) दोघे रा. उमरगा, संतोश सियानंद सहा (वय 30, रा. सरय्या, ता. पताहे, जि. मोतीहारी, बिहार), मोहन रम्‍यकुमार ठाकूर (वय 38, रा. सवाजपूर, ता. करसारी, जि. सिवर, बिहार) असे अपघातात मरण पावलेल्‍यांचे नाव आहे. तर अंबिका युवराज साळुंके (वय 24, रा. उमरगा), माधव एकनाथ मोरे, विद्याधर श्रीधर मोरे, प्रेमनाथ मनोहर बिराजदार, ट्रकचालक प्रशांत किरण मोरे (चौघे रा. तलमोड, ता. उमरगा), अलीसाब बाबमियॉं मुसारी, असलम सत्‍तार शेख, ट्रकचालक सुभाष गणपती रूपनुरे (तिघे रा. मुरुम, ता. उमरगा), मुकेश रामजनम सहा, इंदर शंभूजा सहा, संतोष रामसेवक सहा, धमेंद्र अकबुल सहा (सर्व रा. सवाजपूर, ता. करसारी, जि. सिवार, बिहार) असे जखमी झालेल्‍यांचे नावे आहेत. यातील उमरग्‍याहून हुमानाबादकडे ऊसाची वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम.एच 12 आर. 35737) आणि मिरची व आंबे भरुन तलमोडहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारा ट्रक (क्र. एमएच 25 यु. 4953) यांची समोरासमोर जोराची धडक झाली. यात चौघांचा जागीच मृत्‍ूयू झाला. ही घटना समजताच पोलीसांनी घटनास्‍थळी पोहचून ट्रक खाली अडकलेल्या मयतांना व जखमींना बाहेर काढून उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्‍यात आले. उमरगा पोलिसात दोन्‍ही ट्रकचालकाविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्‍ही.जी. कासले हे करीत आहेत.
 
Top