तुळजापूर -: अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना गंधोरा (ता. तुळजापूर) येथे मंगळवार दि. 19 मार्च रोजी रात्री घडली.
रावसाहेब यशवंत मस्के (रा. गंधोरा, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. रावसाहेब मस्के यांनी मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात अंगावर रॉकेल पेटवून घेतले. त्यात ते गंभीर झाले. त्याना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉ. बागल यांनी केलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसात आकस्मात मृत्यू म्ळणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार सोनवणे हे करीत आहेत.