उमरगा -: सुपतगाव (ता. उमरगा) येथे अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत 17 झोपाड्या जळून खाक झाल्या तर काहीजणांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले तर चार जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून मृत्यमुखी पडल्याची घटना मंगळवार दि. 20 मार्च रोजी दुपारी घडली.
सुपतगाव (ता. उमरगा) येथील सर्व शेतकरी व मजूर रब्बी हंगामाच्या ज्वारीच्या खळयासाठी शेताकडे गेल्यानंतर बाबू स्वामी व शंकर लोखंडे यांच्या घरास अचानक आग लागली. त्यानंतर आजूबाच्या झोपाड्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून चार जनावरे मृत्यमुखी पडले. या आगीमध्ये रावण मातोळे, अंकुश लामजणे, लिंबारी हेंडले, महादेव मातोळे, बाबू स्वामी, विष्णू लामजणे, महादू मडोळे, खंडू लामजणे, शंकर लोखंडे, मधुकर मातोळे, सिध्देश्वर करके, सातलिंग लामजणे, उमराव भालेराव, बाबू हेंडले, विष्णू लामजणे, गौतम कांबळे, विष्णू कांबळे, निवृत्ती सुरवसे आदीच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. त्याचबरोबर या आगीत या सर्वांचे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, कपडालत्ता, जनावरांच्या कडब आदी साहित्य जळून खाक झाल्या आहेत. ही घटना समजताच नागरिकांनी आपापल्या घरातील पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पवार, मंडळ अधिकारी बी.पी. गायकवाड, तलाठी अनिल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्य केले. नुकस्तानग्रसतांना तात्काळ शासकीय मदत देण्यात येण्याचे आश्वासन तहसिलदार दिनेश झांपले यांनी दिले आहे.