नळदुर्ग -: सिंदगाव (ता. तुळजापूर) येथील वडार समाजाच्‍या महिलांनी गावातील दारुबंदी पोलिसांनी तात्‍काळ बंद करण्‍याची मागणी निवेदनाद्वारे नळदुर्ग पोलीस ठाण्‍यास केली आहे.
    निवेदनात म्‍हटले आहे की, सिंदगाव (ता. तुळजापूर) गावात दररोज राजरोसपणे खुलेआम मोठ्याप्रमाणात दारुविक्री केली जात असून सुरु दारुमुळे अनेकांचे संसार उध्‍वस्‍त झाले आहेत. गावातील लोक सध्‍या मोठ्याप्रमाणात दारुच्‍या व्‍यसनाच्‍या आहारी गेले आहेत. दारु पिण्‍यासाठी घरातील वस्‍तू, धान्‍य, भांडी-कुंडी विकून ही मंडळी दारुची तहान भागवित आहेत. त्‍याचबरोबर दारुमुळे गावात नाहक भांडणे होत आहेत. त्‍यामुळे पोलिसांनी तात्‍काळ गावातील दारुविक्री बंद करुन गावात शांतता राखण्‍याबरोबरच गावातील गरीब लोकांचा संसार सुरळीत चालण्‍यासाठी मदत करावी, असे निवेदनात म्‍हटले आहे. या निवेदनावर, रूक्‍मीन कोंडीबा इटकर, रूक्‍मीनी शंकर चौगुले, शांताबाई श्रीमंत चौगुले, सखुबाई शिवराम इटकर, मनीषा सुरेश चौगुले, सोनाबाई शंकर इटकर, गौराबाई शिवाजी चौगुले, विमल तुकाराम चौगुले, रंजना राम इटकर, महानंदा अनिल इटकर, सत्‍यभामा पवार, जनाबाई भीम पवार, शिवानाबाई चौगुले आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.

 
Top