मुंबई -: मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. किशन गोरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस (दुष्काळ) १५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आज सुपुर्द केला.
     मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी आपल्या एक दिवसाचे वेतन या मदत निधीस दिले आहे.
     राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनता अडचणीत आहे. राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्याप्रती विद्यापीठाची असलेली बांधीलकीची जाणीव ठेवून राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या मदत कार्यात आपला हातभार लागावा अशी आशा कुलगुरुंनी आपल्या पत्रामध्ये नमूद केली आहे. यावेळी कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते.
 
Top