मुंबई -: शासनाने राज्य क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीमध्ये सुधारणा केली आहे. सन 2009-10 व 2010-11 या वर्षातील विविध क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना या सुधारित नियमावलीतील तरतुदी विचारात घेऊन आपल्या अर्जात काही सुधारणा करावयाची असल्यास अथवा नव्याने माहिती द्यावयाची असल्यास ती 30 एप्रिल 2013 पर्यंत पाठविण्यात यावी, असे आवाहन यापूर्वी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत करण्यात आले होते. तथापि आता ही तारीख रद्द करण्यात आली असून त्याऐवजी 25 मार्च 2013 पर्यंत ही माहिती मागविण्यात येत आहे.
     राज्य शासनामार्फत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू, संघटक/कार्यकर्ते), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याकरिता 2009-10 आणि 2010-11 या वर्षाचे पुरस्कार अर्ज यापूर्वी 31 मे 2012 पर्यंत मागविण्यात आले होते. आता हे अर्ज 25 मार्च 2013 पर्यंत पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.
     सदर नियमावली क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या www.mahasportal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे; विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांची कार्यालये अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
 
Top