सोलापूर -: राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (एनएचएम) व राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कडील  सर्व योजनांबाबत एकत्रित प्रसिध्दी करुन प्रस्ताव मागविण्यात यावेत अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी दिल्या.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात याबाबत आयोजित आढावा बैठकीत तुकाराम कासार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अशोक किरनळ्ळी, आत्माचे प्रकल्प संचालक डी. एस. गावसाने आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
    या बैठकीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये सन 2012-13 ममध्ये 1356 सामुहिक शेततळ्यांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. तसेच 564 आणखी प्रस्ताव प्राप्त झाले असल्याचे सांगण्यात आले. याबाबत निधीच्या उपलब्धतेनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
    यावेळी रोहयोद्वारे फळबाग लागवड योजना, महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आदिबाबतचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय कृषी विमा योजना, शेतकरी अपघात विमा योजना आदिबाबतही सविस्तर चर्चा होवून शेतकरी अपघात विमा योजनेबाबत व्यापक प्रसिध्दी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी दिल्या. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजनेसाठी प्राप्त निधी व खर्चाचा तपशिल आदिबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला.
    तसेच राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेवर (आत्मा) सन 2012-13 चा आराखडा, भोतिक उद्दिष्ट, झालेली साध्य याबाबतचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे प्रायोगिक तत्वार   ' मुक्तगोठा ' चा प्रकल्प सुरु करण्याबाबत बैठकीत ठरविण्यात आले.
    या दोन्ही यंत्रणांची पुढील महिन्यात बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी सविस्तर नियोजन आराखडा तयार ठेवावा. उदा. शेतकरी सहली काढावयाची असल्यास यासाठीची तरतूद, सहल कोठे जाणार आहे, आदि माहितीसह नियोजन पुढील वर्षीचा संपूर्ण निधी प्राप्त होणार आहे हे गृहित धरुन करण्यात यावे अशा सूचना दिल्या.
    या बैठकीला राष्ट्रीय फलोत्पादन अभियान समितीचे सदस्य प्रभाकर चांदणे, महादेव चाकोते, आत्मा नियामक मंडळाचे सदस्य पांडुरंग रासकर, फरजाना अहमद काजी, केशव घोगरे, युवराज गडदे, संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top