सांगोला (राजेंद्र यादव) :- सांगोला शहरात लायन्स क्लबच्यारक्तपेढीचे बांधकाम सुरू असून येत्या काही दिवसात हे बांधकाम पुर्णहोईल. बांधकाम पुर्ण झाल्यानंतर रक्तपेढीच्या साधन सामग्रीसाठी व इतरसुविधासाठी आपणाकडून शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासनआंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत 323 ड-1 चे प्रांतपाल ला.मनोहरशर्मा यांनी दिले.
       सांगोल शहरातील लायन्स क्लब सांगोला व लायन्स क्लब सांगोला सेंट्रल या संघटनेच्या प्रांतपाल अधिकृत भेट या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल प्रा.प्रबुध्दचंद्र झपके, झोन चेअरमन सौ.शिला झपके, लायन्स क्लबचे अध्यक्ष ऍड.नागेश कुलकर्णी, लायन्स क्लब सेंट्रलचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तेली,ला.सौ.उमा शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.सांगोले शहरातील अजिंक्य प्लाझा या इमारतीत प्रांतपाल भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजी प्रांतपाल प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांनी सांगोला लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा घेताना रक्तपेढीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. झोन चेअरमन सौ. शिला झपके यांनी मनोगत व्यक्त केले. लायन्स क्लब सांगोलाचे अध्यक्ष ऍड.नागेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सचिव ऍड. सारंग वांगीकर यांनी अहवालवाचन केले. सांगोला सेंट्रलचे सचिव उत्तम बेहरे यांनी आभार प्रदर्शनके
ले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिमाशंकर पैलवान यांनी केले. राष्ट्रगीतानेकार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी लायन्स क्लबचेगिरीषभाऊ नष्टे, ऍड.उदयबापू घोंगडे, विलास क्षिरसागर, मनोज सपाटे,चंदन होनराव यांच्यासह अनेक सदस्य व नागरिक उपस्थित होते.
 
Top