नळदुर्ग -: रासायनिक औषधांचा दुष्‍परिणाम मानवी आरोग्‍यावर होण्‍याची शक्‍यता नाकारत येत नसून कुठल्‍याही प्रकारच्‍या मानवी शरीरावर दुष्‍परिणाम न होता विविध आजारावर उपचार करण्‍यासाठी औषधी वनस्‍पती ह्या महत्‍त्‍वाच्‍या असून मानवी आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने औषधी वनस्‍पती अत्‍यंत उपयोगी आहेत. तेंव्‍हा औषधी वनस्‍पतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्ञानकिरण सामाजिक संस्‍थेचे सचिव भैरवनाथ कानडे यांनी गुजनूर (ता. तुळजापूर) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
    वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकार, बायफ पुणे व ज्ञान दीप बहुउद्देशीय शिक्षण संस्‍था, वागदरी (ता. तुळजापूर) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जि.प. प्राथमिक शाळा गुजनूर (ता. तुळजापूर) येथे राष्‍ट्रीय पर्यावरण जाणीव जागृती अभियानांतर्गत औषधी वनस्‍पती विषयी जाणीव जागृतीच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी भैरवनाथ कानडे हे बोलत होते.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शालेय व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष प्रा. जयभिम वाघमारे ह होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणून परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारुती बनसोडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक ज्ञानदीप सामाजिक संस्‍थेचे एस.के. गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन मुख्‍याध्‍यापक राजकुमार मस्‍के यांनी केले. यावेळी गुरु रविदास दलाचे सोमनाथ बनसोडे, कोंडीबा नागमोडे, यांच्‍यासह विद्यार्थी, ग्रामस्‍थ, महिला मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
फोटो ओळ : गुजनूर (ता. तुळजापूर) येथे औषधी विषयी जाणवी जागृतीच्‍या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भैरवनाथ कानडे सह इतर मान्‍यवर दिसत आहेत.

 
Top