सोलापूर -: दुष्काळी भागातून स्थलांतरित होणा-या कुटुंबांना शिधापत्रिका व शिधावस्तु देण्याबाबत शासनाकडून सुचना प्राप्त झालेल्या आहेत. दुष्काळी - टंचाई सदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील शिधापत्रिकाधारक रोजगारासाठी तात्पुरत्या स्वरुपात इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. दुष्काळी भागातून स्थलांतरित होणा-या शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिका व त्यावरील शिधावस्तु स्थलांतरित ठिकाणी असेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात शिधापत्रिकेनुसार शिधावस्तुंचा पुरवठा करावा असे परिपत्रकान्वये कळविले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

 
Top