सांगोला (राजेंद्र यादव) : भारतीय संस्कृतीची चौकट ही जगापुढे आदर्शवत आहे. या चौकटीत राहून भारतीय स्त्रीयांनी आपले संस्कृतीचे वेगळेपण सिध्द केले आहे. अमेरिकेसारख्या सुबत्तता असलेल्या देशामध्ये स्त्रीया मात्र आजही सुखी नसल्याचे चित्र पहावयास मिळते. तेथे घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे. परंतु भारतात मात्र आपल्या संस्कृतीमुळेच स्त्रीया सुखी असल्याचे मत माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुका पत्रकार संघ, श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालय, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 13 मार्च रोजी श्रीमती गीता बनकर अध्यापक विद्यालयात महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरिक्षक सविता कलटवाड या होत्या. यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शालिनीताई कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वजीत नरळे, गीता बनकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सर्फराज खतीब, इनामदार सर, संजीवनी भोसेकर आदी उपस्थित होते.
डॉ. केळकर पुढे बोलताना म्हणाल्या, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीयांना शहाणपण उपजतच आहे पण त्यांना आजही कुटुंबामध्ये सन्मानाने वागणूक दिली जात नाही. महिला संघटीत होत नसल्याने त्या एकमेकींना पुरक होत नाहीत. यासाठी सर्व महिलांनी एकत्र येवून आपली विचारसरणी बदलली पाहिजे. स्त्रीयांनी स्वत:विषयी आणि परिस्थितीविषयीचे आकलण, समजूतदारपणा, एकमेकांबद्दल असणारे गैरसमज तसेच इतरांशी संवाद साधण्याची कला या चार बाबींचा अभ्यास केल्यास स्त्रीशक्ती ही समाजामध्ये बदल घडवू शकते असे सांगितले.
यावेळी बोलताना डॉ.शालिनीताई कुलकर्णी म्हणाल्या, भडकलेल्या अग्नीला शांत करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त स्त्रीमध्येच आहे. स्त्रीच्या अंगी खूप मोठी शक्ती असून दातृत्व, मातृत्व, स्नेह आणि प्रेम या चार गुणांमुळे आजची स्त्री ही सावित्री आहे. स्त्रीया सहनशील असतात परंतु अन्याय किती सहन करायचा याचा विचारही त्यांनी केला पाहिजे. मानसिक आरोग्य चांगले असेल तर शारीरिक आरोग्य चांगले रहाते म्हणून महिलांनी आपले मानसिक आरोग्य जपावे असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा पोलीस उपनिरिक्षक सविता कलटवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आज समाजामध्ये स्त्रीया आणि पुरुषांना समान कायदे आहेत. परंतु आजही महिलांवर अमानुष अत्याचार होत आहेत. समाजात हुंडाबळी ही एक फॅशन झाली असून महिलांनीच हुंडा किंवा स्त्रीभ्रूण हत्येसारख्या विषयात पुढाकार घेवून महिलांचेच प्रबोधन करणे गरजेचे आहे. आज समाजामध्ये वर्तमानपत्रे ही समाजजागृतीचे काम करीत आहेत. महिलांनी त्यांचे वाचन करावे, वाचनसंस्कृती वाढवावी, महिलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. महिला शिक्षणामुळे प्रगत झाल्या आहेत. शिक्षित महिलांनी पुढाकार घेवून सर्व स्त्रीयांची विचारसरणी बदलली पाहिजे. समाजामध्ये जगत असताना ध्येय व उद्दिष्ठे ठेवली पाहिजेत तसेच संस्कृती व चारित्र्याची जपणूक केली पाहिजे. महिला दिनाप्रमाणेच पुरुष दिनही साजरा करुन पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज निर्माण झाल्याचेही कलटवाड यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार राजेंद्र यादव यांनी केले. सुत्रसंचलन सोनाली चोरमुले व सायली खराटे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य सर्फराज खतीब यांनी केले. या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जगदीश कुलकर्णी, सचिव निसार तांबोळी, सहसचिव सुनिल जवंजाळ, खजिनदार उत्तम चौगुले, नाना हालंगडे, भारत कदम, देवदत्त धांडोरे, अमोघसिध्द कोळी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.