बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आपले शरिर संपूर्ण वस्त्रांनी झाकून घ्या, हसतांना समोरचा फसणार नाही त्यापध्दतीने हसा, श्रृंगार करतांना पाहणार्याला साक्षात देवी असल्याचा भास झाला पाहिजे, मर्यादेचे पैंजन घालून हसतमुखाची पावडर लावा, डोळ्यामध्ये पवित्रता असू द्या आणि अजिबात घाबरु नका, असे मत पुणे येथील ब्र.कु.सरिताबहनजी यांनी व्यक्त केले.
विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात संस्काराच्या मार्गदर्शनातून चरित्र निर्माण या विषयावर त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम वीरशैव विद्या संविर्धनी मंडळाच्या लिंगायत बोर्डिंग येथे पार पडला.
यावेळी बार्शीतील सेवाकेंद्र संचालिका संगीताबहनजी, यशस्विनी अभियानच्या अध्यक्षा मंदाताई काळे, नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, पोलिस निरीक्षक गजेंद्र मनसावाले, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षाताई ठोंबरे, महिला पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, पोलीस उपनिरीक्षक शोभा पडवळ, सोलापूर उपक्षेत्र संचालिका सोमप्रभा बहनजी आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना सरिताबहनजी म्हणाल्या, मनुष्याच्या जीवनात आज श्रेष्ठ संस्काराची गरज असून भजन, किर्तन, पूजन आणि दर्शनाने आत्म दर्शन होईल, ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो ते घर, तो समाज आणि तो देश स्वर्ग बनेल. या नारीमध्येच सर्व संकटांचा सामना करणारी दुर्गा, मनो कामना पूर्ण करणारी जगदंबा, शिवबा देणारी जिजाऊ आहे. आपल्या सुरक्षेसाठी आपल्या भाऊ, वडिल, पती, पोलिस वा सरकार यांना जबाबदार मानतो. परंतु सर्व ठिकाणी ते शक्य होत नाही. अंतरिक सुरक्षेसाठी मनाला विविध विकारांपासून, वाईट सवयींपासून स्वत:ला दूर ठेवायला हवे. अत्याचारी शक्तीशाली नसून सहन करणारा कमजोर असल्याने हे होत आहे. मनाला मजबूत बनवून मी शिवशक्ती आहे, हे मनाला पटवून सांगा. आपल्या पाल्यांना हिम्मत न हारण्यासाठी त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे व हाच सर्वात सुंदर संस्कार आहे. प्रत्येकाला प्रेम तसेच सन्मान दिल्यावर जगातील सर्व समस्यांना पूर्णविराम मिळेल. चुका ह्या कोणाकडूनही होऊ शकतात. त्यांना धिक्कारुन अथवा तिरस्कार करुन चालत नाही. जास्त प्रेम दिल्याने त्यांच्या मनात विश्वास निर्माण होऊन परिवर्तन घडेल. मुलांना आदर्श उदाहरण होण्यासाठी आई वडिलांच्या चांगल्या गुणांची गरज आहे. समाजाची सुरक्षा हे नारीचे कर्तव्य आहे. मी एक अबला आहे हे विसरा व एक शक्तीशाली आत्मा असून सर्व शक्तीमान परमात्म्याची सुंदर रचना ही मीच आहे, माझ्याकडेच सर्वशक्तींची किरणे येत आहेत व त्यामध्ये मी सुरक्षीत आहे याचे सतत स्मरण ठेवा. असे विश्वासाने म्हणा. मन बुध्दीचा संबंध परङ्कात्म्याशी जोडा तो तुमचे रक्षण निश्चित करेल. संस्काराद्वारे सर्वांना सुरक्षेचे कवच द्या.
मंदा काळे, प्रा.डॉ.भारती रेवडकर, प्रा.अश्विनी बुडूख, मंदाताई झंवर, संगीता धारुरकर, दमयंती रोडे, ललिता भरिडया, करुणा हिंगिमरे, सविता हालमे, सुवर्णा शिवपुरे, दिपा देशमुख, नीलम माढेकर, विजयश्री पाटील यांना ईश्वरीय भेटवस्तू देऊन गौरिवण्यात आले. अनिल करवा यांनी संस्कारदायिनीची संकल्पना मांडली तर आभार सोमप्रभाबहनजी यांनी मानले.