बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीतील आर.एस.एम.उद्योग समूह व भूम येथील झेप प्रतिष्ठानच्या वतीने भूम येथील उस्‍मानाबाद रोडवरील चांगदेवराव बांगर इंग्लिश स्कूल
     यावेळी गोदावरी विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भूम-परंड्याचे आमदार राहुल मोटे, आर.एस.एम. चे संस्थापक राजेंद्र मिरगणे, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन सुरवसे, रमेश घोलप, माजी जि.प.सदस्य नानासाहेब पाटील, प्रा.अशोक सावळे, शिवाजी पवार, प्रा. अरुण गाढवे, प्रा.संजय पवार,  आर.डी.सूळसर, जमादार, आदिनाथ पालके, राज्यस्तरीय पैलवान बिभीषण पाटील, अमोल वीर, सुनिल चोरमुले, निरंजन ढगे, राजाभाऊ काकडे, के.बी.केरमे, सचिन भोसले, आण्णासाहेब पाटील, व्ही.एन.कदम, सरपंच मुळे, नाना तांबडे, मामू जमादार, अमोल वीर, एच.एम.गिलबिले, पैलवान हाजी हुसेन सय्यद आदिजण उपस्थित होते.
     प्रा. अरुण गाढवे यावेळी बोलताना म्‍हणाले, दुष्काळी परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकर्‍यांसाठी अनेक उपक्रम राबविले व शेतकर्‍यांना योग्य वेळी मदत करुन आधार दिला. सध्याच्या परिस्‍िथतीला बैलजोड्या, पेरणीसाठी दाणे यापेक्षा पाणी महत्वाचे असून त्याकरिता चांगल्या प्रकारचे नियोजन करण्याची गरज आहे. शासकिय नोकरी मिळणे आता शक्य नसतांना सर्वसामान्यांच्या घरातील मुलांना नोकरी मिळविण्यासाठी तसेच प्रत्येकाला विना वशील्याने तसेच जास्त संधी उपलब्ध असलेल्या पोलीस या पदासाठी उपक्रम राबवून मिरगणे यांनी चांगले व्यासपीठ निर्माण केले आहे. आमच्या झेप प्रतिष्ठानमधील सहकारी हे कोणाच्या कसल्याही भानगडीत नसल्याने आमच्याकडून लोकांसाठी चांगलेच काम केले जाईल. यापुढेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सर्वसामान्यांसाठी कार्य केले जाईल.
     प्रा. अशोक सावळे बोलतांना म्‍हणाले की, सध्याच्या काळात बालवाडीत देखिल मोफत प्रवेश मिळत नसतांना मिरगणे यांनी तरुण पिढीतील सुशिक्षीत व योग्य संस्कारीत तरुणांना पोलिस भरतीसाठी ऍकेडमीची निर्मिती करुन उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांकडून त्यांचा सराव केला जात असल्याचे म्हटले.
     पोलीस निरीक्षक सुरवसे म्‍हणाले, सद्यस्थितीतील पोलिस हे इंटरनेटचा वापर करुन अपडेट होत असून, पोलिसांमुळेच समाज सुस्‍िथतीत आहे, पोलिस होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी, सरळ भरती असल्याने वशीला नाही व शारिरीक शिक्षणाबरोबरच स्पर्धा परिक्षेतील अभ्यास देखिल गरजेचा असल्याचे म्हटले.
     रमेश घोलप हे बोलताना म्‍हणाले, स्वत:च्या कुटूंबाची सर्वसाधारण परिस्थिती असतांनाही आय.ए.एस. अधिकारी पर्यंत कोणत्या अनुभवांचा सामना करावा लागला तसेच आपल्या स्वत:ला त्या दर्जाच्या निर्मितीसाठी किती कष्ट व जिद्द असायला पाहिजे व प्रत्येकाला ते सहज शक्य असल्याबाबत अनुभव सांगितले. हरणं म्हणजे कलंक नव्हे आणि भाषा म्हणजे विचार नसून ते व्यक्त करण्याचे माध्यम असल्याचे त्‍यांनी म्हटले. पुस्तकी किडा होण्यापेक्षा भौतिक विकास करा, आपण ज्या समाजात आहोत त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, उघड्या डोळ्यांनी समाज बघून विचारपूर्वक कृती करा असेही ते म्‍हणाले.
     राजेंद्र मिरगणे यांनी बोलतांना म्‍हणाले, अभ्यास प्रत्येक जण करत असला तरी त्यांना मार्गदर्शन महत्वाचे असते व त्याला अनुभवी मार्गदर्शनाची जोड असल्यास चांगला परिणाम दिसतो, किमान या दुष्काळी परिस्थितीमधील लोकांचा अभ्यास केल्यास आपल्याला त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेल्या विकासाबाबत कल्पना येईल. त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या व आपल्याकडील दुष्काळी भागात असलेल्या लोकांनादेखिल त्यांच्या इतपत विकास करणे शक्य होईल. कसलीही सुविधा नसतांना कणखरपणे सर्वोच्च परिक्षेत सुयश मिळविण्यासाठी कोणाला कसलेही कारण देण्यास निमित्‍त मिळू नये अशी यंत्रणा उभी करण्यात येईल. दुष्काळाच्या परिस्थितीत एखाद्या वर्षीचे पिक गेल्यावर त्या शेतकर्‍याच्या मागील तीन ते चार वर्षांच्या मिळालेला फायदा संपुष्टात येतो व त्याला कर्जबाजारी व्हावे लागते. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही तळमळीने पुढे येत नसल्याचे चित्र बर्‍याच ठिकाणी पहायला मिळते. बार्शी, परंडा यानंतर आज भूम येथे प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहे. यानंतर कळंब येथे व उस्‍मानाबादला याचा आरंभ करण्यात येईल. सदरच्या सामाजिक कार्यात काही अधिकारी राजकीय व्यक्तींच्या दबावाने उपक्रम सुरु करण्यासारख्या मानसिकतेतून बोलत आहेत. परंतु आपला मनसुबा चांगला असल्याने चांगल्या भावनेतून हे काम करत असल्याने यात कसलेही अडथळे येणार नाहीत.
     आमदार राहुल मोटे बोलतांना म्‍हणाले की, खाकी, खादी आणि मिडीयाला एकत्र करुन मिरगणे यांनी सामाजिक कार्य सुरु केले असल्याचे सांगत सर्वसामान्यांच्या विकासासाठी आपण कोणत्याही राजकीय दबावात न येता योग्य ती मदत करायला तयार असल्याचे सांगीतले. ज्या विद्यार्थ्‍यांनी संगणकासारख्या क्षेत्राची माहिती घेऊन ज्ञान ग्रहण केले त्यांना छोट्या छोट्या उद्योगातूनही रोजगाराच्या संधी आहेत, मराठी ही मातृभाषा असली तरी इंग्रजी ही मावशी असून त्याचे ज्ञानही घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व ते व्‍यक्‍तीमत्‍त्‍व विकासासाठी आवश्यक आहे. अडचणीत असलेल्या लोकांसाठी खर्च करण्याची दानत कमी लोकांत असते. ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्‍िथतीच्या तरुणांसाठी मिरगणे यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. चांगदेवराव बांगर इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात असलेल्या सराव मैदानाचे तसेच वर्ग खोल्याचे पूजन करण्यात आले. दिप प्रज्वलन तसेच राजमाता जिजाऊच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचलन पोपट बांगर व विद्या सावळे यांनी केले, आभार सोमनाथ देवकर यांनी मानले.
च्या प्रांगणात मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली.
 
Top