
सांगोला नगरपालिकेत नगराध्यक्ष मारूतीआबा बनकर, उपनगराध्यक्ष अरुण बिले, माजी नगरसेवक सुभाष गावडे, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, मनोज सपाटे यांच्या हस्ते श्री संत गाडगेमहाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महेंद्र तोडकरी, संजय दौंडे, उल्हास झपके, सुनिल कोळे आदींसह नगरपालिकेतील कर्मचारी व परीट समाजाचे राजेंद्र यादव, गणेश पाटोळे, दगडू पाटोळे, संतोष पाटोळे, नितीन पाटोळे, सुहास पाटोळे, गिरीराज पाटोळे, अशोक पाटोळे, संतोष चन्ने, सुभाष पाटोळे, आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
परीट गल्ली येथे दगडू पाटोळे यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात युवा नेते बापूसाहेब भाकरे यांच्या व चंद्रकांत शिंदे यांच्या हस्ते श्री गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परीट समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी परीट समाजातील युवकांनी लक्ष घालून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला परीट समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.