ढोकी -: वनविभागाच्या फळ रोपवाटिकेत चार लांडोर मृत अवस्थेत आढळून आल्‍याची घटना ढोकी (ता. उस्‍मानाबाद) येथे घडली. लांडोर यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनासाठी लांडोर उस्मानाबादला नेण्यात आले आहेत.
    शनिवारी दुपारी एक वाजण्‍याच्‍या दरम्‍यान ढोकी येथील वन‍विभागाच्‍या रोपवाटिकेचे काळजीवाहक गणेश गडकर हे रोपांना पाणी देत असताना चार लांडोर मृत अवस्थेत त्यांना आढळून आले. याची माहिती त्यांनी ढोकी पोलिस ठाण्यात दिली. ही घटना समजताच वनपरिमंडळ अधिकारी एच.पी.सूर्यवंशी, वनरक्षक एन.ए.खोबरे, ए.बी. मुंडे, हवालदार एन.आर. दंडे हे घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृत लांडोर ताब्यात घेतले आहेत. लांडोरांचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे.
 
Top