नळदुर्ग -: भरधाव ट्रकने मोटारसायकलस्‍वारास चिरडल्‍याने झालेल्‍या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाल्‍याची घटना नळदुर्ग येथून तुळजापूरकडे जाणा-या रस्‍त्‍यावर शनिवारी दुपारी बारा वाजता घडली. दरम्‍यान अपघातात मरण पावलेला हा मुख्‍याध्‍यापक होता.
    सिद्राम इरसंगपपा व्‍हंड्राव (वय 57, रा. अणदूर) असे अपघातात मरण पावलेल्‍या मुख्‍याध्‍यापकाचे नाव आहे. केशेगाव (ता. तुळजापूर) येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सिद्राम व्‍हंड्राव हे शनिवार रोजी दुचाकीवरुन (एम. एच. २५ ए. ९९७३) अणदूर ( ता. तुळजापूर) हून नळदुर्गकडे येत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी नळदुर्ग जवळील तुळजापूर फाट्यावर आली. त्यावेळी तुळजापूरकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (एम. एच. १६ ए. ई.५७८९) हगयीने व निष्काळजीपणे चालवून मोटारसायकला जोरदार धडक दिली. यात सिद्राम व्‍हंड्राव यांच्‍या अंगावरुन ट्रकची दोन्‍ही चाके गेल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल सुमारे पाऊणशे फुट फरफटत गेली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. संतोष मल्लिकार्जून व्‍हंड्राव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नळदुर्ग पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत. सिद्राम व्‍हंड्राव यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top