बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : मातंग शक्ती या सामाजिक संघटनेच्या नूतन पदाधिकार्‍यांची निवड झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. या संघटनेच्या सोलापूर जिल्‍हाध्‍यक्षपदी कारी (ता. बार्शी) येथील दशरथ जाधव यांची निवड करण्यात आली.
     मुंबई येथील आमदार निवासस्थानात सदरच्या पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. उदगीर येथील आमदार सुधाकर भालेराव यांनी या संस्थेची स्‍थापन केली आहे. यावेळी सौंदरे (ता. बार्शी) येथील जयवंत मोरे यांची तालुकाध्यक्षपदी, बार्शीतील आनंद पवार यांची शहराध्यक्षपदी तर सादिक शेख यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले.
     यावेळी संस्थापक सुधाकर भालेराव, प्रदेशाध्यक्ष बी.डी.चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष रमेश समुखराव, प्रदेश महासिचव संजय मिरगुडे आदिजण उपस्थित होते.
     या संघटनेने सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, आर्थिक,धार्मिक, राजकीय क्षेत्रात काम करणे, गोर-गरिब जनतेच्या संर्वांगीण विकासासाठी तसेच अन्यायाविरुध्द लढणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे हे उद्दीष्ट समोर ठेवले आहे.
     यावेळी भालेराव म्‍हणाले,  समाजातील आर्थिक दुर्बल घटक, मातंग व महिलांसाठी काम करण्यासाठी या संघटनेची निर्मिती झाली आहे. केवळ मातंग समाजाला सामावून घेण्याऐवजी समाजातील सर्वघटकांना यात समाविष्ट करावे.
     सचिन पेटाडे, संतोष गंगावणे, आकाश शिंदे, धर्मराज कांबळे, सिताराम सावळे, नागनाथ चांदणे, मिलींद खंडागळे, विनोद कांबळे, बालाजी खंडागळे, पिंटू जाधव, दत्तात्रय जाधव, महेश जाधव, विठ्ठल वाघमारे, बाळासाहेब जाधव, विक्रम तेलंगी, वैभव भोसले, अविनाश ढाळे, लखन साठे यांनी या निवडीनंतर तालुक्यासाठी चांगल्या उपक्रमास सुरुवात करण्याची घोषणा केली.
 
Top