उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत घेण्यात येणारी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा शनिवार,दि.23 मार्च,2013 रोजी संपूर्ण राज्यात होत आहे. सदर परीक्षेकरिता उस्मानाबाद जिल्हयातील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस 25 हजार 527 विद्यार्थी बसले असून त्यांची बैठक व्यवस्था 108 परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस 17 हजार 865 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले असून त्यांची बैठक व्यवस्था 88 परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे. एकूण 196 परीक्षा केंद्र आहेत. सदर परीक्षांचे बैठक क्रमांक संबंधित मुख्याध्यापकामार्फत सर्व विद्यार्थ्यांस देण्यात आलेले आहेत. काही अडचण असल्यास संबंधित मुख्याध्यापक/ केंद्रसंचालक यांचेशी तात्काळ संपर्क साधावा, परीक्षेस कुठलाही गैरप्रकार होणार नाही, यासाठी सर्व केंद्रावर बैठे पथके नियुक्त केलेली आहेत. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्याचे दृष्टीने सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, केंद्र संचालक यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी ‘प्राथमिक, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.