उस्मानाबाद :- प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या आठही तहसील कार्यालयात दि. 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      उस्मानाबाद येथील तहसील कार्यालयात हा उपक्रम होणार असल्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
    अर्जाचा नमुना बालविकास प्रकल्प अधिकारी, उस्मानाबाद यांच्या कार्यालयात उपलब्ध असून महिलांनी विहित नमुन्यात दोन प्रतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे,विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी आणि तक्रार अथवा निवदेन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. 
 
Top