उस्मानाबाद -: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या वतीने वर्ष 2013-14 मध्ये उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त विधी साक्षरता शिबीरे घेण्याकरीता कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थेकडून अधिस्विकृती आणि सहाय्यक अनुदानाकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. संबंधितांनी आपले प्रस्ताव तीन प्रतीत  सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांचे नावे दि. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5  वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
       यामध्ये स्थानिक संस्थांना प्राधान्य असून विधी साक्षरता शिबीरे घेण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे. अशा संस्थेने प्रस्तावासोबत विहित फॉर्म (पुर्णपणे भरलेले) नोंदणी प्रमाणपत्र, संस्थापन लेख, अधिसंघ नियमावलीची प्रत, मागील तीन वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल, मागील अर्थिक वर्षाचा संस्थेचा वार्षिक अहवाल, प्रती शिबिराकरिता होणारा संभाव्य खर्च व अंदाजपत्रक, विधी साक्षरतामध्ये कामाचा अनुभव असल्याबाबतची कागदपत्रे, 2013-14 मध्ये किती व कोणकोणत्या ठिकाणी शिबिरे घेणार याबाबतची माहिती  ( किमान 20 शिबीरे ) आदि तपशिल नमूद करणे आवश्यक आहे.
 
Top