नळदुर्ग -: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्‍या तुळजापूर तालुक्‍यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांची तालुकास्‍तरीय बैठक मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्‍यात आली आहे.
    या बैठकीस रिपाइंचे जिल्‍हाध्‍यक्ष राजाभाऊ ओव्‍हाळ, जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, मराठवाडा विभाग सचिव आनंद पांडागळे आदीजण उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत दि. 8 एप्रिल रोजी मुंबई मंत्रालयावर आयोजित रिपाइंच्‍या विविध मागण्‍याविषयीचे मोर्चा, गायरान जमीन, पाणीटंचाई, महागाई, मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांचे शिष्‍यवृत्‍ती, मराठा समाजाचे आरक्षण आदीसह इतर अन्‍य महत्‍त्‍वाच्‍या विषयावर चर्चा करण्‍यात येणार आहे. तरी तुळजापूर तालुक्‍यातील सर्व रिपाइं कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्‍येने उपस्थित राहावे, असे आवाहन रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, उपाध्‍यक्ष विठ्ठल जेटीथोर, युवा आघाडी तालुकाध्‍यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे, तुळजापूर शहराध्‍यक्ष अरुण कदम, विद्यार्थी आघाडी तालुकाध्‍यक्ष शुभम कदम आदींनी केले आहे.
 
Top