बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीच्यावतीने दि. 1 ते 7 एप्रिल दरम्यान बेरोजगार युवा उद्योजकांसाठी शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पवार यांनी दिली.
     या प्रशिक्षण कार्यक्रमात शेड व्यवस्थान, शेळ्यांच्या जाती, निवड, आजार, उपचार, लसीकरण, व्यवसायाच्या संधी, प्रकल्प अहवाल, व्यवसाय व्यवस्थापन, बाजारपेठ तंत्र, मांस उद्योगातील संधी, करायची निगा, ठानबंद शेळीपालन इत्यादी तसेच सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण याबरोबरच शासकीय कर्ज योजनासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.
     सदरच्या प्रशिक्षणासाठी कोणत्याही वयाची अथवा शिक्षणाची अट नाही, महिला, यवक, युवतींनाही यात सहभाग घेता येणार आहे. दि. 1 ते 7 एप्रिल या दरम्‍यान दररोज 1 ते 4 या वेळेत महात्‍मा गांधी शॉपींग सेंटर, युवा परिवर्तन महाविद्यालयात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी विलास शिंदे 9667272935 या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Top