ननळदुर्ग -: महिलांवरील वाढते अत्‍याचार व हिंसाचार रोखून, चांगल्‍या सुसंस्‍कारित समाजाच्‍या निर्मितीसाठी थोर महापुरुषांच्‍या जयंती साजरी करण्‍याबरोबरच त्‍यांचे विचार प्रत्‍यक्षात आचरणात आणून आत्‍मसात केल्‍यास निश्चितच समाज परिवर्तन होईल, त्‍याकरिता युवकांनी सामाजिक बांधिलकी म्‍हणून पुढाकार घेण्‍याचे आवाहन शिक्षण महर्षी तथा माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांनी केले.
    नळदुर्ग येथे शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समितीच्‍यावतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा बसवेश्‍वर महाराज, वीर महाराणा प्रताप या थोर महापुरुषांची जयंती एकत्रित साजरी करण्‍यात येत आहे. शनिवार रोजी सात वाजता तिन्‍ही महापुरुषांच्‍या प्रतिमांची प्रतिष्‍ठापना प्रमुख मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पूजन करुन श्रीफळ वाढवून करण्‍यात आले.  या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण महर्षी तथा माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी  हे उपस्थित होते. तर व्‍यासपीठावर दृष्‍टी शुगर उद्योग समूहाचे अध्‍यक्ष अशोकरराव जगदाळे, प्रशासकीय अधिकारी प्रशांत जगदाळे, शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष बसवराज धरणे, नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सय्यद सावकार, नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, राष्‍ट्रवादीचे गटनेते नय्यर जहागिरदार, सचिन डुकरे, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, शिवसेना उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर,   माजी नगराध्‍यक्ष दत्‍तात्रय दासकर, माजी नगरसेवक सुधीर हजारे, शरद बागल, स्‍वातंत्र्य सैनिक जनार्धन होर्टीकर, पत्रकार शिवाजी नाईक, विलास येडगे, शाम कनकधर, मुस्लिम क्रांती सेनेचे अध्‍यक्ष खय्युम कुरेशी, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी नगरसेवक कमलाकर चव्‍हाण बोलताना म्‍हणाले की, सध्‍या सर्वत्र भीषण दुष्‍काळ पडले असून नागरिकांनी पाण्‍याचा अपव्‍यय टाळावे, पाण्‍याचा काटकसरीने वापर करुन नळांना तोट्या बसवावे असे सांगून थोर महापुरुषांच्‍या काळात पाणीटंचाई व त्‍यावर त्‍यांनी केलेली मात यावर सविस्‍तर माहिती सांगितले.
    शहरातून शनिवार रोजी दुपारी चार वाजता भव्‍य मोटारसायकल रॅली काढण्‍यात आली. या रॅलीत दीडशे ते दोनशे मोटारसायकलवर भगवे ध्‍वज लावून युवक सहभागी झाले होते. ही मोटारसायकल रॅली व्‍यंकटेश्‍वर नगर मधून काढण्‍यात आली. इंदिरा नगर, रामलिला नगर, व्‍यासनगर, श्रीकृष्‍ण मंदीर, बसस्‍थानक, शास्‍त्री चौक, भवानी चौक, सावरकर चौक,  शिवाजी चौक, संभाजी चौक, पाचपीर चौक, किल्‍ला गेट, क्रांती चौक, चावडी मार्गे बसवेश्‍वर चौकातून भवानी चौकात या रॅलीची सांगता झाली. त्‍यानंतर सायंकाळी सात वाजता भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्‍मा बसवेश्वर महाराज, वीर महाराणा प्रताप यांच्‍या प्रतिमेची प्रतिष्‍ठापना करण्‍यात आली. याप्रसंगी दै. पुढारीचे प्रतिनिधी शिवाजी नाईक यांना पुणे येथील काव्‍यमित्र संस्‍थेचा राज्‍यस्‍तरीय युवाचेतना पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल त्‍यांचा शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समितीच्‍यावतीने उद्योगपती अशोकरराव जगदाळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांच्‍या हस्‍ते फेटा बांधून शाल, पुष्‍पहार, श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला. तर पत्रकार विलास येडगे यांना नळदुर्ग येथील प्रज्ञावंत संस्‍थेचा बोधिसत्‍व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्‍यस्‍तरीय समता पुरस्‍कार जाहीर झाल्‍याबद्दल त्‍यांचा माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, जनार्धन होर्टीकर यांच्‍या हस्‍ते फेटा, शाल, पुष्‍पहार, श्रीफळ देऊन सत्‍कार करण्‍यात आला.
    नळदुर्गच्‍या मैलारपुर येथील खंडोबाच्‍या यात्रेत दि. 28 जानेवारी रोजीच्‍या दुर्घटनेत संतोष चव्‍हाण, महादेव कोकणे यांचा मृत्‍यू झाल्‍याने त्‍यांच्‍या कुटुंबियाना सि.ना. आलुरे गरुजी, अशोकराव जगदाळे, शब्‍बीरअली सावकार, दत्‍तात्रय दासकर, शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समिती प्रत्‍येकी पाच हजार रुपयाची मदत देण्‍यात आली. तर नय्यर जहागिरदार यांनीही आर्थिक मदत देण्‍याचे जाहीर केले. यावेळी कोकणे व चव्‍हाण यांच्‍या मुलीं व मुलांचा संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आलुरे गुरुजी यांनी घेतली. या कायक्रमाचे प्रास्‍ताविक, सूत्रसंचालन व आभार विनायक अहंकारी यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले, शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्‍मोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष बसवराज धरणे, उपाध्‍यक्ष सुनील गव्‍हाणे, कैलास घाटे, नवल जाधव, सनी भूमकर, अप्‍पू स्‍वामी, शिवाजी सुरवसे, महेंद्र डुकरे, सौरभ रामदासी, संजय जाधव आदींनी परिश्रम घेतले.
 
Top