नळदुर्ग -: भरधाव मोटारसायकलची ट्रकला धडक बसून झालेल्‍या अपघातातजागीच ठार झाल्‍याची घटना केशेगाव (ता. तुळजापूर) येथील कोरेवस्‍ती येथे घडली.
    सद्दाम बशीर शेख (वय 22, रा. केशेगाव, ता. तुळजापूर) असे अपघात मरण पावलेल्‍या मोटारसायकलस्‍वाराचे नाव आहे. यातील सद्दाम शेख हा आपल्‍या मित्राला इटकळहून केशेगावला आणण्‍यासाठी इटकळकडे मोटारसायकल (क्रं. एमएच 25 वाय 8090) घेवून जात असताना ही मोटारसायकल अत्‍यंत भरधाव वेगात होती. दरम्‍यान कोरेवस्‍तीनजीक रस्‍त्‍याच्‍या कडेला उभ्‍या असलेल्‍या ट्रक (क्रं. एमएच 42 बी 7650) च्‍या पाठीमागच्‍या बाजूस जोरास धडक बसली. या अपघातात सद्दाम शेख याच्‍या छातीस व डोक्‍यास गंभीर जखम झाली होती. याचवेळी परिसरातील नागरिकांनी त्‍यास सोलापूर येथे उपचारासाठी पाठविले असता, वाटेतच त्‍याचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी इटकळ पोलीस ठाणे येथे ट्रक व ट्रकचालकास चौकशीसाठी ताब्‍यात घेतले आहे. पुढील तपास हवालदार बजरंग सरपाळे हे करीत आहेत.
 
Top