

नळदुर्ग येथे शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्यावतीने दि. 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रताप या तीन महापुरुषांची जयंती एकत्रित साजरी करण्यात येणार असून शनिवार दि. 30 मार्च रोजी दुपारी चार वाजता शहरातील प्रमुख मार्गासह विविध चौकातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता भवानी चौकात तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना व मान्यवरांचा सत्कार, रात्री आठ वाजता प्रा. परमेश्वर आरबळे यांचे जाहीर व्याख्यान होईल. रविवार दि. 31 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता बालकिर्तनकार ह.भ.प. कु. शिवलिला पाटील यांचे किर्तन होणार आहे. सोमवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता महापुरुषांच्या प्रतिमेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन कासार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शिव-बसव-राणा समितीचे अध्यक्ष बसवराज धरणे, समितीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक संजय बताले, अमृत पुदाले, माजी नगरसेवक शरद बागल, सुधीर हजारे, विनायक अहंकारी, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले यासह कार्यकर्ते आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.