सोलापूर -: राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार 2012-13 करिता दि. 10 एप्रिल पुर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकार दिपक ढेपे यांनी केले आहे.
    शरिरिक व मानसिकदृष्ट्या अपंगत्व असलेल्या मुलांच्या कल्याणासाठी कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता मानवी सेवा या उदात्त हेतुने सलग 10 वर्षे वैशिष्ट्यपूर्ण व अद्वितीय असे काम करणा-या व्यक्तीस केंद्र शासनातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये एक लाख रोख व प्रशस्तीपत्र असे आहे.
    सदर पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाचे www.wcd.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर प्रस्ताव शासनास सादर करताना वरील बाबीची पुर्तता करुन परिपुर्ण प्रस्ताव चार प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165/ए, सुरवसे टॉवर, रेल्वे लाईन्स, सोलापूर येथे दि. 10 एप्रिल 2013 पुर्वी सादर करण्यात यावा.               
 
राष्ट्रीय विशेष नैपुण्य पुरस्कार 2013 प्रस्ताव पाठवा
सोलापूर  -: राष्ट्रीय विशेष नैपुण्य पुरस्कार 2013 करिता दि. 5 एप्रिल पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकार दिपक ढेपे यांनी केले आहे.
    राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारा हा पुरस्कार शिक्षण, कला, सांस्कृतिक व क्रिडा याक्षेत्रात विशेष नैपुण्य दाखविणा-या मुलामुलींना केंद्र शासनातर्फे देण्यात येतो. प्रथम पुरस्कारासाठी रु. 20 हजार रोख व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक व इतर 35 पुरस्कारासाठी चांदीचे पदक, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि रु. 10 हजार रोख देण्यात येतात.
    पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर पस्ताव  शासनास सादर करातना वरील बाबींची पुर्तता करुन परिपुर्ण प्रस्ताव चार प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165/ए, सुरवसे टॉवर, रेल्वे लाईन्स, सोलापूर येथे दि. 5 एप्रिल 2013 पुर्वी सादर करण्यात यावा.
               
राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार 2012-13 प्रस्ताव पाठवा
सोलापूर -: राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्काराकरिता दि. 10 एप्रिल पुर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकार दिपक ढेपे यांनी केले आहे.
    बाल कल्याणाच्या क्षेत्रत उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना त्यांच्याकार्याचा गौरव म्हणून केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. व्यक्तीगत रुपये 50 हजार रोख व मानचिन्ह व 5 संस्थंसाठी प्रत्येकी रुपये 2 लाख रोख व स्मृतीचिन्ह असे यापुरस्काराचे स्वरुप आहे.
    सदर पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाचे www.wcd.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर प्रस्ताव शासनास सादर करताना वरील बाबीची पुर्तता करुन परिपुर्ण प्रस्ताव चार प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 165/ए, सुरवसे टॉवर, रेल्वे लाईन्स, सोलापूर येथे दि. 10 एप्रिल 2013 पुर्वी सादर करण्यात यावा.   
 
Top