उस्मानाबाद -: जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती असताना नागरिकांनी रंग खेळताना पाण्याचा वापर टाळावा आणि केवळ सुरक्षित व कोरड्या रंगांचाच वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी केले आहे.
होळीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, पाणीटंचाईची परिस्थिती असताना नागरिकांनी रंग खेळण्यासाठी पाण्याचा वापर करु नये. डोळ्यांना अथवा शरीराला कोणताही अपाय होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्य शासनाच्या वतीनेही राज्यातील जनतेला रंग खेळताना पाण्याचा वापर टाळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.